Corona Pimpri Update : पोलिसासह आठ जणांची कोरोनावर मात; बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून टाळ्यांचा कडकडाटात डिस्चार्ज

Eight people, including police, beat Corona; Applause from Covid19 Care Center in Balewadi

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पॉझिटिव्ह आलेला पहिला पोलीस कर्मचारी आज (बुधवारी) कोरोनामुक्त झाला. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आठ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना महापालिकेने तयार केलेल्या बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून टाळ्यांचा कडकडाट आणि फुलांचा वर्षाव करत डिस्चार्ज देण्यात आला.  यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर  कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

शहराच्या नवीन भागात रुग सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत शहरातील 441 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आजपर्यंत 180 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महापालिकेने बालेवाडी स्टेडीयम येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 300 बेडचा क्वारंटाईन वार्ड तयार केला आहे. याठिकाणी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण त्यांना काहीच लक्षणे नाहीत अशा रूग्णांना ठेवले जाते.

या कोविड केअर सेंटरमधून आज आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनावर मात केलेल्यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलीस दलातील पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

तसेच त्यांच्या कुटुंबातील चारजण आणि आणखी तीन अशा आठ  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  यावेळी डॉ. विनायक पाटील, नर्स आदी उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी रुग बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे.

आजपर्यंत 180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.