Pimpri: म्हाडाचे घर नावे करण्यासाठी मुलगी व जावयानेच केली वयस्क आई वडिलांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  म्हाडाचे घर नावे करावे यासाठी मुलगी जावई यांनी खोटे नोटरी इच्छापत्र तसेच बनावट (Pimpri) वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून वयस्क आई-वडिलांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 27 जानेवारी 2023 ते शुक्रवारी (दि.12) या कालावधीत पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.12) पिंपरी पोलीस ठाण्यात 60 वर्षीय आईने फिर्याद (Pimpri)दिली आहे.,यावरून मुलगी, तिचा पती अविराज चिंतामण वैराट (वय 47 रा. ) तसेच रघुनाथ शंकर पोटोळे, सागर काशिनाथ भिसे, सतिशकुमार तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri: शस्त्राचा धाक दाखवून वकिलाला जिवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीचे पिंपरीतील संत तुकारामनगर येथे  म्हाडाचे घर आहे. हे घर मुलीला स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पतीच्या खोट्या स्वाक्षरी करत खोटे नोटरी प्रमाणपत्र व बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून फिर्यादीची व त्याच्या पतीची फसवणूक केली आहे., याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.