Pimpri: जिल्ह्यातील निवडणूक खर्च निरीक्षक जाहीर

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अनुक्रमे असे आहेत. या सर्व निरीक्षकांची निवास व्यवस्था व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथे करण्यात आली आहे.

जुन्नर, आंबेगाव व खेड आळंदीसाठी पिजूष मुखर्जी, भ्रमणध्वनी-9404541959, निवास व्यवस्था – बी-105 येथे आहे. शिरूर, दौंड व इंदापुरसाठी रोशन लाल, भ्रमणध्वनी-9404542504, निवास व्यवस्था- बी-201 येथे आहे. बारामती, पुरंदर व भोरसाठी अमलेंदू नाथ मिश्रा, भ्रमणध्वनी-9404540280, निवास व्यवस्था- बी-202 येथे आहे.

मावळ व चिंचवडसाठी रोहित मेहरा, भ्रमणध्वनी-9404542546, निवास व्यवस्था-बी-103 येथे आहे. पिंपरी व भोसरीसाठी अमरसिंग नेहरा, भ्रमणध्वनी-9404541239, निवास व्यवस्था- बी-101 येथे आहे. वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी किरण कटटा, भ्रमणध्वनी-9404541610, निवास व्यवस्था-बी-203 येथे आहे. शिवाजीनगर,कोथरूड व खडकवासलासाठी विजय चौधरी, भ्रमणध्वनी-9404541631, निवास व्यवस्था-बी-205 येथे आहे. पर्वती, हडपसर व कसबापेठसाठी सैलेन समादर भ्रमणध्वनी 9404539878, निवास व्यवस्था-बी-102 येथे आहे.

मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रारी अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.