Pimpri: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘चुनाव पाठशाळा’

जनजागृतीसाठी सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा घेणार

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातर्फे (चुनाव पाठशाळा) मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच जनजागृतीसाठी सायकल रॅली काढणे, रांगोळी स्पर्धा घेणे यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात आज (सोमवारी) ही कार्यशाळा पार पडली. सन 2014 च्या लोकसभा आणि विधानसभेची मतदान टक्केवारी विचारात घेता. जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरीता मतदारांची टक्केवारीत वाढ होण्यासाठी तसेच 100 टक्के मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 399 चुनाव पाठशाळांची निर्मीती करुन त्यांचेमार्फत मतदार प्रशिक्षित करणे. चुनाव पाठशाळांच्या नोडल ऑफीसर आणि सहाय्यक यांनी सायकल रॅली काढणे, रांगोळी स्पर्धा घेणे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन 100 टक्के मतदान होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  • मतदाराने मतदान करणे. यामध्ये महिला, युवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. शासकीय, निमशासकीय, पब्लिक सोसायटी, ग्रुप्स मीडिया आणि NGO, तसेच शैक्षणीक संस्था NSS, NCC, तरुणांच्या संघटना, ज्येष्ठ नागरीक यांच्या मदतीने मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर उपस्य्थीत ज्येष्ठ नागरीकांचे प्रतीनिधी विकास पाटील, मुथियान यांनी 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर मतदान करणेसाठी ‘मी लोकशाहीप्रती जागृत राहण्याच्या दृष्टीने मी आपल्या देशाच्याप्रती प्रतीज्ञा करतो की मुक्त, निष्पक्षपणे व शांततेमध्ये आगामी लोकसभा/विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय, भाषा आणि इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मी निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतो”, अशी सामुदायीक शपथ घेण्यात आली.

  • या कार्यक्रमाकरीता 399 मतदान केंद्राचे (BLO) नोडल ऑफिसर व त्यांचे सहाय्यक, अ-क्षेञीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, ‘ब’ क्षेञीय कार्यालयाचे अधिकारी संदीप खोत, ‘ह’ आशा राउत, सहाय्यक आयुक्त जनसंपर्क तथा जिल्हा समन्वयक अधिकारी अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी माधव खोत व इतर एनजीओ संस्थाचे प्रतिनीधी तसेच महाविद्यालय, शासकीय कार्यालयाचे प्रतिनीधी उपस्थित होते. मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.