BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लोकसभा निवडणूक; मतदान कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजाबाबत प्रशिक्षण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील निवडणूक कर्मचा-यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. दोन हजारहून अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. मशिन हाताळणीसह निवडणुकीच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षित कर्मचा-यांनी मशिन हाताळण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

मावळ लोकसभा मतदारसंघा अंतर्गत 206 पिंपरी विधानसभा मतदार संघातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणा-या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना दोन सत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेल्या सुमारे दोन हजार मतदान अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. नोडल अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांनी प्रशिक्षणार्थींच्या शंकाचे निवारण केले. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक वजाळे यांनी उत्तम नियोजन करून सहा मास्टर्स ट्रेनर व 45 क्षेत्रिय अधिकारी व सुमारे 50 इतर कर्मचारी यांची नेमणूक केलेली होती. प्रमोद ओंभासे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी विजय भोजने यांनी दिली.

पहिल्या सत्रात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 819 कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. पिंपरी मतदारसंघातील 2100 कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील कर्मचा-यांसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले. भोसरीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.

सार्वत्रिक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)यंत्राचा वापर केला जाणार आहे. या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे. ‘व्हीव्हीपीएट’ यंत्राचा वापर होणार असल्याने केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या टिमसाठी सरावाकरीता आकुर्डी, प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन सेक्टर 26 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये ईव्हीम मशिन ठेवण्यात येणार आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.