Pimpri : पिंपरीतील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील वीज पुरवठा कालपासून खंडित झाला आहे. दुसरा दिवस उजाडला तरी वीज पुरवठा सुरु झाला नाही. पहिल्याच पावसात महावितरणचा फज्जा उडाला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात काल वळीवाचा पाऊस पडला. वादळी वारे आले होते. पाऊस पडल्याने शुक्रवारी रात्री सात वाजता पिंपरी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. पिंपरी परिसरातील वीज पुरवठा अद्यापही सुरू झाला नाही. पहिल्याच पावसात महावितरणच्या कामाचा फज्जा उडाला आहे. पिंपरी परिसरात शासकीय, खासगी कार्यालये, दैनिकांची कार्यालये मोठ्या संख्येने आहेत. दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.

शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीची कामे करणे आवश्यक असताना. ती कामे केली गेली नाहीत. शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या कामाचा फज्जा उडाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.