BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : तत्व, मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद -नितीन बनसोडे

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – शेतकरी कामगार पक्ष हा विचारधारा असणारा पक्ष आहे. विचारधारा ही कधीही संपत नसते. शेकाप आपला जनाधार लवकरच होणा-या 29 एप्रिलला दाखवेल असा विश्वास शेकापचे अध्यक्ष नितीन बनसोडे व  महिला अध्यक्षा छायावती देसले यांनी व्यक्त केला. तळोजा प्रचार दौ-या दरम्यान शेतकरी कामगार पक्ष  हा जनधार संपलेला व निवडणुकीत बाजारीकरण करणारा पक्ष आहे अशी टीका महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली होती. त्याला शेकापच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तत्व व मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद आहे. शेकाप ही वेल असून झाडांच्या आश्रयाने तग धरुन आहे, तत्वाला आणि मूल्याना धरुन राहिला असता तर शेकापवर ही वेळ आली नसती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने लुटल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. मात्र 2014 च्या आधी आपला पक्ष कोणता होता हे विसरले, मग लुटीत सहभागी होते असे समजावे का ? ज्या झाडाचा उपयोग केला आज ती वेल झाली का ? असा सवाल करण्यात आला आहे.
  • तत्व व मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हिच शेकापची ताकद आहे. ज्याच्याकडे तत्व व मूल्य नाही सत्तेचे बाजारीकरण हेच ज्याचे धोरण आहे त्यांनी शेकापला शिकवू नये. शेकापचे नेते व कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहेत असे या प्रसिद्धीपत्रकात  म्हटले आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.