Pimpri : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पिंपरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना

गुरुवारी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्यासाठी बहुतांश प्रवासी जिना चढणे नापसंद करतात. जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडला जातो. यासाठी पिंपरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले. या जिन्याचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी (दि. 28) मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या जिन्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

पिंपरी रेल्वे स्थानकावर दोन पादचारी मार्ग आहेत. परंतु या जिन्यांचा वापर अगदी मोजकेच प्रवासी करतात. बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणे पसंत करतात. यामुळे वेळ वाचतो आणि जास्त श्रमही करावे लागत नाही. परंतु अशा शॉर्टकटच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडणा-या कित्येक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. तरी देखील ही परिस्थिती सुधारता-सुधारत नाही.

वृद्ध नागरिकांना मात्र हे जिने चढण्यासाठी खूप अडचण येते. वयोवृद्धपणा आणि शारीरिक व्याधींमुळे ते पाय-यांचा जिना चढू शकत नाहीत. त्यामुळे वृद्ध नागरिक देखील बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडतात. यामध्ये देखील काही वृद्धांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे खासगी कंपनीच्या सीएसआर फंडातून पिंपरी रेल्वे स्थानकावर दोन्ही बाजूला सरकत्या जिन्याचे काम करण्यात आले. या जिन्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. जिन्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून प्रवाशांची सुरक्षितता यामुळे राखली जाणार आहे. गुरुवार पासून हे सरकते जिने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.