Pimpri: शहरात सलग अकराव्यादिवशी कोरोनाचे रुग्ण; तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 43 वर; आजपर्यंत शहरातील 57 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अकराव्यादिवशी कोरोना रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. आज (शनिवारी) तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 41 वर पोहचली आहे.  आजपर्यंत शहरातील 57 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

भोसरीतील फर्निचरच्या दुकानात कामाला असलेला आणि हिंगोली या मूळगावी गेलेल्या 21 वर्षाच्या तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हा तरुण काही दिवसांपुर्वी घशात दुखत असल्याने  वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता.  तो  परभरणीतील आपल्या बहिणीकडे गेला होता. त्याला त्रास होऊ लागल्याने तपासणी केली असता, तो पॉझिटीव्ह आला आहे. परभणीतील रुग्णालयात तो दाखल आहे. तर, पुण्यातील कमांड हॉस्पीटलमध्ये एक रुग्ण आणि ससूनमध्ये एक रुग्ण दाखल आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 57 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 41 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 36 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, सहा सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात तर एकावर परभणीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.