Pimpri : विधानसभेसाठी शिवसेनेचे अकरा जण इच्छुक; मुंबईत झाल्या मुलाखती

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे अकराजण इच्छुक आहेत. पिंपरीत दोन, चिंचवडमध्ये तीन आणि भोसरीतून सर्वाधिक म्हणजेच सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, केवळ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यामुळे पिंपरीचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुलाखत दिली नाही.

इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी (दि. 10 ) मुंबईत मातोश्रीवर मुलाखती पार पडल्या. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, अमोल कीर्तिकर यांनी मुलाखती घेतल्या. प्रत्येक इच्छुकांची स्वतंत्र मुलाखत घेण्यात आली. शिवसेनेचा विद्यमान आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून थेरगावचे नगरसेवक ऍड. सचिन भोसले आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे या दोघांनी मुलाखती दिल्या आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे या तिघांनी मुलाखती दिल्या आहेत. भोसरी मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजेच सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. याच जागेवरून शिवसेना-भाजप या मित्र पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही पक्षाकडून या जागेवर दावा केला जात आहे. शिवसेनेकडून कामगार नेते सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, माजी नगरसेवक भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक बाजीराव लांडे, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, रवींद्र खिलारे, शरद हुले यांनी मुलाखत दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like