Pimpri : दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अकरा लाखांची कॉपर वायर चोरीला

एमपीसी न्यूज – गोदामाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 10 लाख 77 हजार 261 रूपयांची कॉपर वायर चोरून नेली. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

सागर सुरेशकुमार पेहलानी (वय 28, रा. सुखवानी सिटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांचे रॉयल वर्ल्ड शाळेजवळ, पिंपरी येथे असलेले गोदाम कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी मेनगेट तसेच आतील दरवाजाचा कडीकोयंडा तोडला.

गोदामतील सुमारे 10 लाख 77 हजार 261 रूपयांची कॉपर वायर चोरून नेली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.