BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ग्लोबल हार्मोनियमची परदेशी रसिकांना भुरळ

एमपीसी न्यूज – भारतीय संगीत आणि हार्मोनियम वाद्याचा जगभर प्रसार व्हावा, यासाठी हार्मोनियम वादक संतोष घंटे विविध प्रयोग करत आहेत. त्यांच्या ग्लोबल हार्मोनियम या कार्यक्रमांतर्गत त्यांनी देशोदेशीच्या संगीतप्रेमींना भुरळ घातली.

हार्मोनियम वाद्याचा प्रसार ग्रामीण भागापासून वेगवेगळ्या देशामध्ये व्हावा, या उद्देशाने ग्लोबल हार्मेोनिमय या प्रयोगाद्वारे संतोष घंटे अनेक दौरे करत आहेत. त्यासाठी गेल्या सात ते आठ वर्षात विविध १८ देशांमध्ये जाऊन आले. नुकतेच त्यांनी युरोप दौ-यावर जाऊन हार्मोनियम वादनांचे अनेक कार्यक्रम केले.

  • त्यांच्या ग्लोबल हार्मोनियम या प्रयोगांतर्गत युरोपमधील पियानोवादक सुप्रानो आणि ओपेरा गायक व्हॅलेटिंना यांच्यासोबत विविध स्वरविष्कार सादर केले. बलोग्ना (इटली) येथेही हार्मोनियम वाद्याचे प्रयोग केले. बेल इन्स्टुमेंटल वादक एलिनासोबत तेथील संगीतप्रेमींना भारतीय संगीताचा परिचय करुन दिला.
HB_POST_END_FTR-A2