Pimpri: भाजप नगरसेवकांची उद्या तातडीची बैठक; बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत सस्पेन्स

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांची उद्या (बुधवारी) तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. विधानसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच बैठक आयोजित केल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

मोरवाडीतील पक्ष कार्यालयात बुधारी दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून भापजला अपेक्षित असे मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यापार्श्वभूमीवर निकालनंतर उद्या भाजप नगरसेवकांची पहिल्यांदाच तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बैठकीच्या कार्यक्रमप त्रिकेबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. सर्व भाजप नगरसेवकांना बैठकीचे निरोप धाडण्यात आले असून बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.