Pimpri : शिवसेनेच्या वर्धापन दिनी सामाजिक उपक्रमांवर भर; आरोग्य कर्मचाऱ्यांना मेडिकल किट आणि छत्रीचे वाटप

Emphasis on social activities on Shiv Sena's anniversary; Distribution of medical kits and umbrellas to health workers

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापनदिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मेडिकल किट आणि छत्रीचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अमित गावडे, शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना योद्धयांचा सन्मान, सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आज महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मेडिकल किट आणि छत्री यांचे वाटप केले.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या मेडिकल किटमध्ये एक N95 मास्क, दोन हॅन्ड ग्लोज, पाच साधे मास्क यांचा समावेश आहे.

तसेच आरोग्य कर्मचारी भर पावसात काम करत असतात. पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्यांना छत्री देखील देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.