Pimpri:  चिनी वस्तूंवरील कर वाढवून, स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन द्या- गजानन बाबर

एमपीसी न्यूज – भारत देश मोठी बाजारपेठ असल्याने चीन आपला जास्तीत जास्त माल भारतामध्ये कसा विकला जाईल याचा प्रयत्न करत असतो.भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण आपल्या स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वदेशी माल खरेदी करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे. म्हणून चिनी वस्तूंवरील कर वाढवून भारतीय लोकांना चिनी वस्तू घेण्यास अनुत्सुक करायाला हवे, असे मत माजी खासदार गजानन बाबर यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणाऱ्या पत्रात गजानन बाबर म्हणतात की, भारताचा शेजारी असणाऱ्या चीनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. त्यात सीमेवर चीन नेहमी भारत विरोधी कुरापती करत असतो. चीनने भारताला कधीही मदत केली नाही उलट भारताचे खच्चीकरण करण्याचाच प्रयत्न केला. कोरोनाच्या तपासणीसाठी आयात करण्यात आलेली ‘रॅपिड टेस्टिंग किट’ सुद्धा सदोष असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपण स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वदेशी माल खरेदी करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे. असे केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

बाबर पुढे म्हणतात, चीनी वस्तूंची अवस्था ‘चले तो देर तक नहीं तो शाम तक’ अशी असते. निव्वळ आकर्षणापोटी खेरेदी होणार्रा वस्तूंवर कर वाढवून भारतीय लोकांना स्वदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. भारतातील तरुणाई मध्ये मोठी क्षमता आहे त्यांना प्रवृत्त करून स्वदेशी निर्मिती आणि विक्रीवर भर दिला पाहिजे. त्यामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन आर्थिकदृष्ट्या देश सक्षम होईल. चिनी वस्तूंवर बंदी किंवा बहिष्कार घालण्यापेक्षा त्याच्यावरील कर वाढवला जावा अशी विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.