Pimpri : बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या 40 विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

Encroachment department action against 40 vendors selling illegal food : लॉकडाऊन असतानाही काही व्यावसायिक रस्त्यावर बेकायदा अन्न पदार्थ विक्री करत होते

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन असतानाही बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या 40 स्टाॅल, दुकानांवर महापालिकेने मंगळवारी (दि.21) रोजी कारवाई केली. 

अतिक्रमण विभागातील विशेष 8 पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली.  पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन असतानाही काही व्यावसायिक रस्त्यावर बेकायदा अन्न पदार्थ विक्री करत होते.

दरम्यान, 19 जुलै पासून लाॅकडाऊनमध्ये  करण्यात आली आहे.   त्यानुसार अधिकृत फळ व भाजी विक्रेते आणि दुकानदारांना विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. तरीही बेकायदा विक्री  करणाऱ्या दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली आहे.

विक्रेत्यांमुळे नागरिकांची   गर्दी वाढू लागली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हे नियमांचे उल्लंघन करून अन्न पदार्थ विकणाऱ्या 40 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे स्टाॅलही जप्त करण्यात आले आहेत.

लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर सकाळी 8 ते 12 वाजे पर्यंत विक्री करण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.