Pimpri: पिंपरी कॅम्प परिसरात पालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने बुधवारी (दि. 3) पिंपरी कॅम्प परिसरात शगुन चौक, काळेवाडी परिसरातील अतिक्रमणवर धडक कारवाई केली. 21 हातगाड्या, दोन लोखंडी काऊंटर, टेम्पो असा ऐवज जप्त करण्यात आला.

‘अ’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन चौक, डिलक्स टॉकीज, जयहिंद शाळेसमोर, पिंपरी स्मशानभूमी शेजारी तसेच काळेवाडी पुलाजवळ अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये 21 हातगाड्या, दोन लोखंडी काऊंटर, एक टेम्पो, एक लोखंडी रॅक जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले आहे.

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. सदर कारवाई कामी तीन बीट निरीक्षक व पाच अतिक्रमण पोलिस कर्मचारी हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.