Pimpri: वनराईच्या सहकार्याने उद्यापासून दोन दिवसीय पर्यावरण साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज – पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे वनराई संस्थेच्या सहकार्याने येत्या 19 व 20 फेब्रुवारी रोजी पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, तर स्वागताध्यक्षपदी डॉ. अभय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल असून, अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. संमेलनाला जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, इसीए संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील आणि वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले आहे.

संमेलनात पहिल्या दिवशी पहिल्या पर्वात प्रदीप वाल्हेकर, निलेश लोंढे, धनंजय शेडबाळे, विठ्ठल वाळुंज संगणक सादरीकरणाद्वारे पर्यावरणाविषयी माहिती देतील. सकाळी 11.15 वाजता आर्या चिद्दवार पर्यावरण आकलन सादर करतील. दुसऱ्या पर्वात इसीएचे विकास पाटील संमेलनाची आवश्यकता विषयावर भूमिका मांडतील. 11.30 वाजता संमेलनाचे विशेषाध्यक्ष मनोहर पारळकर हे सामाजिक जबाबदारी, दुपारी 12 वाजता डॉ .चंद्रशेखर अय्यर नागरिकांची जबाबदारी व योगदान, 12.20 वाजता डॉ. अभय कुलकर्णी इ-कचरा घातक परिणाम / व्यवस्थापन, 12.35 वाजता डॉ. कमलकांत वढेलकर पर्यावरण संवर्धन : माध्यमांची भूमिका, 12.50 वाजता पर्यावरण अभ्यासक मकरंद टिल्लू पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरण पुढाकार, संजय कुलकर्णी महापालिकेची पर्यावरण संबंधी भूमिका मांडणार आहेत.

तिसऱ्या पर्वात अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन व प्रदर्शनाचे उदघाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होईल. 2.10 वा. डॉ. उपेंद्र धोंडे पाणलोटाची जल धारण क्षमता, 2.30 वा. सतीश खाडे हे आजची गरज व आवश्यकता, 2.45 वा. डॉ. महेश गायकवाड हे वन्य जीव व जंगल, 3 वा. राजेंद्र सराफ पर्यावरणात जन सहभाग, 3.15 वा. डॉ. किशोर निकम तरुण पिढीचा शास्त्रीय दृष्टीकोन, 3.30 वा. प्रश्नोत्तरे , नागरिकांच्या शंका व सूचना, 4 वा. पर्यावरण विषयक कविता वाचन व सादरीकरण होणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यावरण संवर्धन विषयक पथ नाट्य स्पर्धा, सकाळी 11.15 वा. डॉ. धर्मराज पाटील हे जंगल जीवनवर व्याख्यान, 11.30 वा. हिरामण भुजबळ हे वनस्पतींचे औषधी उपयोग, 11.45 वा. कर्नल शशी दळवी रेन वाटर हार्वेस्टिंग, दुपारी 12 वा. उमेश मुंडले हे देवराई, 12.15 वा. प्रभाकर तावरे हे विषमुक्त शेती / शहरी कचरा व्यवस्थापन, 12.30 वा. नागरिक चर्चा व मतप्रदर्शन, 2 वा. पर्यावरण ठराव सूचना, दुपारी 2.30 वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया मार्गदर्शन करणार आहेत. 2.45 वा. संमेलन अध्यक्षांचे मार्गदर्शन, 3.30 वा. पारितोषिक वितरण समारंभ शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.