Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – मतदारांना ‘मतदार स्लिप’चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची स्थापना केली जाणार आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. सर्व मतदारांना ‘मतदार स्लिप’ वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या निवडणूक विभागाच्या सूचना आहेत. पिंपरी मतदारसंघात 11 ऑक्टोबरपासून ‘मतदार स्लिप’ वाटण्यात येत आहेत. 82 टक्के मतदारांना स्लिपचे वाटप झाले आहे.

पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची स्थापना केली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्याकडील सर्व माहितीसह मतदार कक्ष स्थापन करणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कक्षाचे काम सुरु राहणार आहे. मतदारांच्या शंकाचे निराकरण, शिल्लक मतदार चिठ्ट्यांचे वाटप, मतदानाबाबत मार्गदर्शन व आवश्यक ती सर्व माहिती देण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्राच्या इमारतीमधील मतदार कक्षातून आपल्या नावाची चिठ्ठी घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिका-यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.