BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मोरवाडीत गुरुवारी गौतम बुध्द यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – नगरसेवक तुषारभाऊ हिंगे मित्र परिवार आणि मैत्री बुध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी (दि.18) पिंपरीत तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.  
पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपीनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजता हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बौध्द धर्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी नागपूर) चे अध्यक्ष सुरई ससाई यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने  बौध्द धर्मगुरू असलेले सुरई ससाई पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच येत आहेत.
  • गौतम बुध्द यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंत्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 65 बौध्द विहारांना निमंत्रण देण्यात आले आहे. गौतम बुध्दांची शिकवण आत्मसात करणा-या सर्वच शहरवासीयांनी या समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन  तुषारभाऊ हिंगे मित्र परिवार व मैत्री बुध्द विहाराच्या वतीने करण्यात आले आहे.
HB_POST_END_FTR-A4

.