BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: आचारसंहिता लागू; महापौरांनी सरकारी गाडी जमा केली अन्‌ दुचाकीवरुन घरी गेले

एमपीसी न्यूज – देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या क्षणापासून लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधि-यांनी सरकारी वाहने जमा करण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होताच शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी सरकारी वाहन जमा केले अन्‌ दुचाकीवरुन घरी रवाना झाले.

देशातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (रविवारी) सायंकाळी केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

  • महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या वापरात शासकीय वाहने आहेत. या पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले. त्यानंतर दुचाकीवरुन महापौर जाधव घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान दोन महिने पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरावर निर्बंध आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like