Pimpri : नगरसेविका माया संतोष बारणे यांचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घ्यावा-आमदार लक्ष्मण जगताप

वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात सुमारे 4 हजार जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – नगरसेविका माया बारणे आणि माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे हे नेहमीच आगळा वेगळा उपक्रम प्रभागात राबवत असतात. आज माया बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत महत्वपूर्ण असा समाजउपयोगी उपक्रम राबवण्यात आला. यात प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत आहे. त्यांचा आदर्श घेऊन समाजातील इतर मान्यवरांनी देखील असाच उपक्रम राबवला पाहिजे, जेणेकरून आपल्या परिसरात प्रत्येकाचे आरोग्य निरोगी आणि सक्षम होईल, असे मत पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

नगरसेविका माया संतोष बारणे यांचा वाढदिवस बुधवारी (दि.25 ) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच कै.नागुभाऊ गतीराम बारणे मेडिकल फाउंडेशनचे उद्घाटन यानिमित्त करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते थेरगावमधीव संतोष मंगल कार्यालयात या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले होते.

सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात सुमारे ४ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, ज्येष्ठ नगरसेविका झामाताई बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, गोल्डमॅन सनी वाघचौरे, बंटी गुजर आदी मान्यवर उपस्थित होते

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, नगरसेविका मायाताई संतोष बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी थेरगाव आणि परिसराततील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. त्यांचा आदर्श घेऊन समाजातील इतर मान्यवरांनी देखील असाच उपक्रम राबवला पाहिजे. जेणेकरून आपल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी आणि सक्षम होईल.

महापौर माई ढोरे म्हणाले की, नगरसेविका माया संतोष बारणे यांचा वाढदिवस अत्यंत स्तुत्य उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवस म्हटलं की मोठं सेलिब्रेशन केले जाते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत नगरसेविका माया संतोष बारणे यांनी अतिशय आगळावेगळा उपक्रम राबवत समाजापुढ एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सध्याचं धावते जग, यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या शरीरावर होताना दिसत आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीला आजारांचा विळखा वाढत आहे. याच गोष्टींचा विचार करून नगरसेविका माया संतोष बारणे यांनी अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे. शहरातील सर्वच मोठे हॉस्पिटल या शिबिरात सहभागी झाले आहेत. या शिबिरामुळे नागरिकांना आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी अगदी मोफत करून मिळत आहे. या शिबिरामध्ये महिलांसाठी सर्व तपासणी करून देण्यात आली आहे. पूर्णपणे मोकळ्या मनाने महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया, किडनी विकार व प्रत्यारोपण हाडांचे व मणक्याचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग, बॉडी चेकअप, कान-नाक-घसा, अनियंत्रित रक्तदाब आणि शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच लहान मुलांच्या हृदयावरील वरील उपचार करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, या सर्व आजारांवर आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शिबिरामध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल, रूबी केअर हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल थेरगाव यांचा सहभाग होता.

दरम्यान, कै.नागुभाऊ गतीराम बारणे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने रूग्णवाहिकेचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या महाआरोग्य शिबीराचे आयोजन माजी विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे यांनी केले होते. तर, संयोजन अनिल बोरकर, हेमराज बाविस्कर, राजू वैद्य, गणेश देशमुख, विठ्ठल भिसे, गणेश गुजर तसेच माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.