Pimpri : कोरोनाच्या अटकावासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज – डॉ. अविनाश भोंडवे

Everyone needs to be vigilant to prevent corona - Dr. Avinash Bhondwe

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनचा कालावधी शिथिल होत असताना व विविध ठिकाणी खासगी कार्यालयांचे कामकाज सुरु होत असताना आता प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.

‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘कोरोना विषयक जनजागृती कार्यशाळेत आज (बुधवारी) मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार कशाप्रकारे होतो, कोरोना बधिताची लक्षणे काय आहेत, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कशाप्रकारे उपाययोजना करायला हव्यात, याबाबत सविस्तर माहिती सांगितली.

नोकरदार व्यक्तींनी कामाच्याठिकाणी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती दिली. नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थापन व कर्मचारी या दोन्ही घटकांनी खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. भोंडवे यांनी सांगितले की, कोरोना संक्रमणाच्या काळात कोणत्याही अफवेला बळी न पडता जाणकारांकडून योग्य ती माहिती घ्यावी.

आपले निष्काळजी वर्तन कोरोनासाठी आमंत्रण ठरू नये, यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे, ऑपरेशन प्रमुख कृष्णा सावंत यांच्यासह सामाजिक अंतराचे नियम पाळत मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे पवन शर्मा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1