Pimpri: ‘ईव्हीइम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ची प्रात्यक्षिकासह दिव्यांगांना मतदान प्रक्रियेची माहिती

एमपीसी न्यूज –  अंध-अपंग आणि दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ रीतीने सांगण्यासाठी आणि मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मतदान जागृतीची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. ईव्हीइम आणि व्हीव्हीपॅट याबाबतची प्रात्यक्षिकासह माहिती दिव्यांग मतदारांना देण्यात आली. 
या कार्यशाळेत ईव्हीइम मशीन आणि व्हीव्हीपॅट या बाबतची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. यावेळी अंध अपंग मतदारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका तयार करण्यात आली असून मतदान युनिटवर ब्रेल लिपीतील अंक छापण्यात आले आहेत. प्रहार अपंग क्रांती संघटना आणि घरकुल अपंग सहाय्य संस्था यांनी याकामी विशेष सहकार्य केले. या संस्थाच्या सहकार्याने सुमारे 75  दिव्यांग मतदारांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  • यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर, नायब तहसीलदार अर्चना निकम, EVM मशीन तज्ज्ञ सुहास बहाद्दरपुरे तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले आणि घरकुल अपंग सहाय्य संस्थेच्या अध्यक्ष संगीता जोशी हे उपस्थित होते. याप्रसंगी SVEEP समन्वय अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे आम्हाला मतदान करणे सुलभ होईल अशी भावना दिव्यांग मतदारांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अपंग कक्ष अधिकारी भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारांना मतदान करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मतदान जनजागृती कक्षाचे सहाय्यक अधिकारी प्रदीप शिंदे, बाळासाहेब जाधव, डॉ. अविनाश वाळुंज, क्षितीज शिंदे व मनोज मराठे यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.