Pimpri : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन च्यावतीने राबविले स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) च्यावतीने रविवारी (दि.28 एप्रिल) २७ स्वयंसेवकांनी विशालनगर,पिपळे निलखमधील भारतीय सेना दलाच्या मोकळ्या पटांगणावर स्वच्छता अभियान राबविले. दोन तासाच्या अवधीत हजारो काचेच्या दारूच्या बाटल्या. तेवढ्याच प्रमाणात प्लॅस्टिक दारूच्या बाटल्या,कपडे, प्लॅस्टिक बॅग्स, प्लॅस्टिक वस्तू , टाकावू कपडे व इतर कचरा मोकळ्या जागेत एकत्रित करून सर्व कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या ताब्यात दिला.

परिसरातील सोसायट्यामध्ये आणि रस्त्यावर सकाळी चालणाऱ्यांना इसिएचे संस्थाप्रमुख विकास पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीविषयी माहिती दिली .तसेच दोन तास पायी फिरून प्रत्येक घरोघरी जाऊन मागर्दर्शन केले. त्यात स्थानिक लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्याबाबत मनपा आरोग्य विभागास सूचना विशद केल्या.

  • आज सुमारे दोन ट्रक भरेल एवढा कचरा जमा झाला. कचरा किती जमा झाला त्यापेक्षा नागरिक किती बेजवाबदारपणाने वर्तन करतात. त्याचे हे उत्तम आणि संवेदनहीन असल्याचे समाजात आहे. महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या मार्फत कृतीशील जनजागृती आणि प्रबोधन उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आज कमीत कमी १०० पेक्षा जास्त जागा अशा आहेत कि ज्या ठिकाणी राजरोज उघड्यावर नागरिक दारू पीत बसतात. अन् दारूच्या बाटल्या, सोबत आणलेले खाद्यपदार्थ, पिशव्या आदी वस्तू तेथेच फेकून देऊन जातात. आपल्या शहरातील अशा बेजवाबदार आणि गलिच्छ सवयींच्या लोकांमुळे शहरातील मोकळी पटांगणे, नदीघाट, नदीपुला खालील मोकळ्या जागा, रस्त्यावरील फ्लायओवरच्या शेवटल्या अडगळीच्या जागा, मनपाच्या सार्वजनिक बागा, मनपा शाळा पटांगणे, महापालिका दवाखान्यामागील अडगळीच्या जागा दारूच्या बाटल्यांनी व्यापलेल्या रोज दिसतात.

  • रविवारी सवडीनुसार एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन( इसिए) श्रमदानाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न मागील दहा वर्ष्यापासून करीत आहोत. भोसरी, नेहरूनगर, इंद्रायणी नगर, एमआयडीसी, चिखली गावठाण, मोरेवस्ती, वाकड, पिंपळे निलख, विशाल नगर आदी उच्चवर्गातील वस्ती शेजारच्या परिसरात हि समस्या जास्त जाणवत आहे.

आज काचेच्या फुटलेल्या बाटल्यांच्या काचा सर्व शहरभर रस्त्यांच्या कडेने दिसत आहेत. कारण कोणताही भंगार व्यावसायिक काच विकत घेत नाही. त्यामुळे अनवाणी चालणा-या मंडळीस आणि प्राण्यांना ह्यापासून इजा होत आहेत. नदी पात्रात पुलावरून फेकलेल्या बाटल्यांच्या काचा पाण्यात दिसत नाहीत. त्यामुळे कित्येकांच्या पायाला इजा होत आहे.

  • याबाबत दररोज संध्याकाळी अशा ठिकाणी दारू पिणा-यांवर बंदी घातली पाहिजे. यासाठी पोलीस यंत्रणेकडून विशेष मोहिम राबविली पाहिजे.

आजच्या स्वच्छता अभियानात इसिए संस्थेचे प्रमुख विकास पाटील (पर्यावरण तज्ञ) , विनिता दाते, सुषमा पाटील, अंजना सोनावणे, अंजली देशपांडे, संगीता घोडके, राहुल श्रीनिवास, शिकंदर घोडके, गोरक्षनाथ सानप, इंद्रजीत चव्हाण, मनपा आरोग्य विभागा आरोग्य पर्यवेक्षक शशिकांत मोरे ,प्रकाश शिंदे ,राजू फडतरे आणि सुमारे ११ सफाई कर्मचारी व १५ शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

  • एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए)च्या वतीने सार्वजनिक मोकळ्या जागेवर राजरोस मद्यपान करण्याच्या बेजवाबदार वर्तनास आळा बसावा, यासाठी पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड व पुणे शहर याना निवेदन लोकसभेच्या निवडणुका निकाल लागल्यानंतर दिले जाणार आहे, असे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.