Primpri : हॉकी एक्‍सलन्सी, क्रीडा प्रबोधिनी, हॉकी पुणे उपांत्यपूर्व फेरीत

हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी

एमपीसी न्यूज – गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीसह क्रीडा प्रबोधिनी आणि हॉकी पुणे संघांनी येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातत्याने गोलधडका लावणाऱ्या हॉकी पुणे संघाला आज विजयासाठी मैदानावर उतरावेच लागले नाही. प्रभाकर अस्ताप अकादमी संघाने त्यांना पुढे चाल दिल्यामुळे त्यांचा विजय विनासायस साकार झाला.

अन्य एका सामन्यात दोन वेळच्या विजेत्या एक्‍सल्नस अकादमी संघाला रेल्वे पोलिस बॉईज संघाचा प्रतिकार सहन करावा लागला. एक्‍सलन्सी अकादमी संघाने 3-2 असा विजय मिळविला. आणखी एका सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संगाने विक्रम पिल्ले अकादमीचा 4-0 असा सहज पराभव केला.

  • एक्‍सलन्सी अकादमीच्या आक्रमकांची आजच्या सामन्याच रेल्वे पोलिस बॉईजच्या बचावफळीने चांगलीच कसोटी पाहिली. रेल्वे पोलिस बॉईजचा बचाव भेदणे त्यांना कठिण जात होते. सामन्याच्या 17व्या मिनिटाला हर्ष परमार याने संघाचे खाते उघले. पण, पूर्वार्धातच 28व्या मिनिटाला उदय बारामतीकर याने रेल्वे पोलिस बॉईज संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर उत्तरार्धात पुन्हा एकदा विनीत शेट्टी याने 37व्या मिनिटाला गोलकरून एक्‍सलन्सी संघाला आघाडीवर नेले. मात्र, दहाच मिनिटांनी रोहन मुसळे याने बरोबरी साधणार गोल केला. त्यांचा हा आनंद दोनच मिनिटे टिकला सामन्याच्या 49व्या मिनिटाला अनिकेत मुथय्याने एक्‍सलन्सी संघाचा विजयी गोल केला.

आजच्या अखेरच्या साम्नयात क्रीडा प्रबोधिनी संघाने दोन्ही संत्रात एकेक गोल करून विक्रम पिल्ले अकादमीला निष्प्रभ केले. विजयी संघाकडून वेंकटेश केंचे आणि राहुल शिंदे, हरिष शिंगडी यांनी गोल केले.

  • निकाल :
    हॉकी पुणे वि.वि. प्रभाकर अस्पात अकादमी (पुढे चाल)
    एक्‍सलन्सी अकादमी 3 (हर्ष परमार 17, विनीत शेट्टी 27, अनिकेत मुथय्या 49वे मिनिट) वि.वि. रेल्वे पोलिस बॉईज 2 (उदय बारामतीकर 28, रोहन मुसळे 47वे मिनिट) (मध्यंतर 1-1)

क्रीडा प्रबोधिनी 4 (वेंकटेश केंचे 6, 45, राहुल शिंदे 6, हरिष शिंगडी 45वे मिनिट) वि.वि. विक्रम पिल्ले अकादमी 0 (मध्यंतर 2-0)

  • शुक्रवारचे सामने :
    स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात वि. रोव्हर्स अकादमी अ -दु. 12 वा.
    हॉकी पुणे वि. इन्कमटॅक्‍स, पुणे -दु. 1.15 वा.
    मुंबई कस्टम वि. क्रीडा प्रबोधिनी -दु. 2.30 वा.
    एक्‍सलन्सी अकादमी वि. मुंबई रिपब्लिकन -दु. 3.40 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.