BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ निगडीतील दुचाकी रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

1,261
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा सुरु आहे. या प्रचारार्थ आज (रविवारी) निगडी येथे बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला शहरातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

या रॅलीत माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, धनंयय भालेकर, प्रवीण भालेकर आदी आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या रॅलीमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणाईंची गर्दी पाहण्यास मिळाली. बाईक रॅलीचा शुभारंभ निगडी गावठाण येथून झाला.

  • ही रॅली निगडी गावठाणातून रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली, साने चौक, मोरेवस्ती, फुलेनगर, कृष्णानगर, घरकुल, शरदनगर, कुदळवाडी, जाधववाडी, बो-हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, च-होली, दिघी, भोसरी, नेहरुनगर या मार्गावरून रॅली काढण्यात आली.

अजमेरा येथे रॅलीचा समारोप झाला. शहर आणि उपनगर भागात काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. दुचाकी रॅली काढून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. मतदारसंघात परिवर्तन आणि विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.