Pimpri: जलनि:सारण वाहिन्यांची साफसफाई व चोकअप काढण्याच्या कामास मुदतवाढ, साडेसात कोटीचा खर्च

Extension of work for cleaning and choking up of sewers, cost of Rs. 7.5 crore

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रभागातील जलनि:सारण वाहिन्यांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करण्यासह चोकअप काढण्याचे काम सुरू आहे. या कामाला एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यासाठी येणा-या 7 कोटी 40 लाख खर्चासह एकूण 10 कोटी 33 लाख रकमेच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक कापडी मास्क खरेदी करणेकामी येणार्‍या 1 कोटी 50 लाख रकमेच्या खर्चास सभेत मान्यता देण्यात आली.

पालिकेमार्फत सांगवी-किवळे या बीआरटीएस रस्त्यावरील काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यान कावेरीनगर येथे नव्याने सब-वे बांधण्यात आला आहे.

या सब-वेच्या कामामुळे 132 केव्हा टॉवर लाईनचे जमिनी पासूनचे (vertical Clearance) नियमापेक्षा कमी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

या कामाचे वीज पर्यवेक्षण शुल्काच्या 32 लाख 60 हजार रकमेच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. संसर्गजन्य रोग नियंत्रणात आणणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

वायसीएम रूग्णालयास आवश्यक लागणारे PPE Kit withN95 Mask खरेदी करण्यासाठी येणा-या एकूण 82 लाख 76 हजार रकमेच्या खर्चास स्थायीच्या सभेत मंजूरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.