Pimpri: पिंपरी महापालिकेच्या धन्वंतरी योजनेसाठी तीन कोटीची वाढीव तरतूद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत शहरातील खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार मोफत दिले जातात. या योजनेसाठी तीन कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेने धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू केली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना त्याचा लाभ घेता येतो. त्यानुसार महापालिकेने मान्यता दिलेल्या खासगी रूग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. खासगी रूग्णालयाने केलेल्या उपचार व रूग्णसेवेचे बिल महापालिकेकडून अदा केले जाते.

या योजनेमध्ये महापालिकेच्या सेवेतील 6 हजार 890 अधिकारी, कर्मचारी तसेच 883 सेवानिवृत्त असा एकूण 7 हजार 773 कर्मचा-यांना योजनेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील 120 खाजगी रुग्णालयांशी करारनामे केले आहेत. यानुसार कर्माच्या-यांच्या वैद्यकीय खर्चाचा काही वाटा महापालिका भरते. या योजनेसाठी तीन कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.