Pimpri : तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी व परिषद उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी व पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी येथे मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर व परिषद आयोजित
करण्यात आली आहे.

या शिबिराचे व परिषदेचे उदघाटन प्रसंगी डॉ. एन जे. पवार कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे, व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद
महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, उप प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, विभाग प्रमुख शालाक्यतंत्र व आयोजक सचिव
डॉ. नीलिमा अमृते तसेच डॉ. मधुसूदन झंवर अध्यक्ष पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, डॉ. पारस शहा पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान व चेअरपर्सन
तिरळेपणा निर्मूलन व श्री ओमप्रकाश पेठे डी.जि. लायन्स क्लब पुणे उपस्थित होते .

_MPC_DIR_MPU_II

तिरळेपणा घालवण्यासाठी 9 नोव्हेंबरला 56 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. पारस शहा , डॉ. राजेश पवार पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या टीमने शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.

शस्त्रक्रिया शिबिर व परिषदेचा 10 नोव्हेंबरला समारोप करण्यात आला. समारोपाच्या वेळी रुग्णांनी या शस्त्रक्रियांमुळे नवीन आयुष्याची सुरुवात
झाली ‘ अशा समाधानी प्रतिक्रिया दिल्या. संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ. स्मिता जाधव यांनी अशा स्वरूपाच्या समाजोपयोगी
उपक्रमांचा व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयातील सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. नीलिमा अमृते ,डॉ. पल्लवी जगताप, डॉ. संतोष राहिंज, डॉ. आनंद काळे, डॉ.अभिजित घाडगे, डॉ. गुणवंत येवला (प्राचार्य ), डॉ. प्रशांत खाडे
(उपप्राचार्य), डॉ. बी .पी. पांडे (सल्लागार ). डॉ. पृथ्वीराज उगळे (उपअधीक्षक) व अमोल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1