Pimpri : क्रांतिवीर चापेकर विद्यालयात विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर 

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लायन्स क्लब ऑफ आकुर्डी फिनिक्स निगडी  यांच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी विना मूल्य नेत्र तपासणी करण्यात आली. व मशिनद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले की डोळे कसे तपसायचे? व कशी हालचाल होत असते? याची माहिती देण्यात आली. 

या नेत्र तपासणी  शिबिरासाठी हिरामण गवई,प्रदीप कुलकर्णी ,विक्रम माने ,शशांक फाळळे  चंद्रकांत पवार ,आसिम गांधी, वसंत गुजर ,रज्जन कुमार ( पंजाब ) ,राजेंद्र काळे आदींनी  नेत्र तपासणीस उपस्थित होते व विद्यार्थ्यांना नेत्र आयोग्याविषयी मार्गदर्शन केले .
यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे ,शालेय समिती अध्यक्ष अशोक  पारखी, गतिराम भोईर व मुख्याध्यापिका वासंती तिकोने , मुख्याध्यापक  जगन्नाथ देवीकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रशालेत नेत्र तपासणी पार पडली. संचालक शरद जाधव ,व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे ,सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी, स्मिता जोशी, सरला पाटील, वीणा तांबे, प्रमोदिनी बकरे ,वर्षा जाधव, राजश्री पाटील , सुलभा झेड़े माधुरी गाडेकर , अंगद गरड , भीमसेन चांडे,प्रदीप नागणे, राजेश शर्मा,आदी  उपस्थित होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.