Pimpri: शहरातील ‘या’ 16 ठिकाणी भरणार शेतकरी आठवडे बाजार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भाजीपाला, फळे मिळावीत यासाठी महापालिकेने शहरातील विविध 16 ठिकाणी आजपासून अटी-शर्तीसह शेतकरी आठवडे बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने चार दिवस आठवडे बाजार बंद केले होते. परंतु, लॉकडाऊन वाढला. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला मिळावा याकरिता आजपासून आठवडे बाजार चालू करण्यास मान्यात दिली आहे. पुढील आदेशापर्यंत अटी-शर्तीसह आठवडे बाजार चालू राहणार आहेत.

  • आठवडे बाजार भरण्याची ठिकाणे!
  • केशवनगर, चिंचवड,
  • नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरीवाघेरे,
  • सेक्टर नंबर 29, राधेय हाईट शेजारी रावेत,
  • ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी काळेवाडी फाटा वाकड,
  • पिंपळेनिलख बसस्टॅन्ड शेजारी महापालिकेचे मोकळे मैदान,
  • सेक्टर नंबर 4 पी, 132/1 शिवशंभो उद्यान संभाजीनगर,
  • सेक्टर नंबर 26 महापालिका जलतरण तलाव निगडी, प्राधिकरण,
  • मुंबई-पुणे मेहता हॉस्पीटलजवळ काळभोरनगर,चिंचवड,
  • कुस्ती मैदान 11 नंबर बस स्टॉपजवळ, प्रभाग क्रमांक 14 सेक्टर नंबर 4487, आरक्षण क्रमांक 268 आकुर्डी,
  • प्रभाग क्रमांक 30 सेक्टर नंबर 497/2 आरक्षण क्रमांक 32 कासारवाडी,
  • अहिल्यादेवी शाळा मैदान जुनी सांगवी,
  • सम्राट चौक मोरवाडी, पिंपरी,
  • प्रबोधनकार ठाकरे मैदान यमुनानगर, निगडी,
  • शंकरराव मासुळकर मंडई शेजारी तुळजाभवानी मंदिर मासुळकर कॉलनी आणि
  • पीसीएमसी मैदान रोझ इस्कॉन जवळ पिंपळेसौदार या 16 ठिकाणी आठवडे बाजार भरविण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

या आहेत अटी-शर्ती!
प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर द्यावे,

सॅनिटायझन टनेलचा वापर करावा,

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी.

बाजारामध्ये एकाच ठिकाणी गर्दी करु नये,

सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे.

बाजारात येताना चेहरा झाकणे, मास्क वापरणे बंधनकारक,

घरी गेल्यावंर हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटाईझ करावेत.

सुरक्षिततेमुळे आठवडे बाजारात 65 वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश दिला जाणार नाही.

बाजारासह कुठेही थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दारु पिण्यास, दारु पिऊन प्रवेश करण्यास मनाई आहे.

ग्राहकास भाजी पाल्यास हात लावू देऊ नये,

गाळेधारकास स्वत: सॅनिटायझरचा वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.