Pimpri :’त्या’ डॉक्टरचे प्रमोशन करुन त्यांचा सत्कार करा – युवासेना पिंपरी विधानसभेची मागणी

'त्या' डॉक्टरांकडून रुग्णावर चुकीचा उपचार केल्याची बाब उघडकीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये एका रु्गणाची किडनी निरोगी असून देखील किडनी खराब झाल्याचे सांगून त्यांचे डायलेसिस केले. त्यामुळे या डॉक्टरच्या बुध्दीमत्तेविषयी आणि निष्काळजीपणाचा नवीन पराक्रम केला आहे. अतिउत्कृष्ट शिरोमणी डॉक्टर यांना प्रमोशन करुन त्यांचा सत्कार करावा, अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभेने आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा गंभीर प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. एका तरुणाच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित असताना देखील डॉक्टरांनी त्यावर डायलिसिसची प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या उत्तम असतानाही काही कारण नसताना त्याचे डायलसिसकेले गेले.

  • आपल्या रुग्णालयातील अशा बेजबादारपणे काम करणाऱ्या तसेच रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडक कारवाई करावी. झालेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून यावर लगेच कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दयावेत, अशा डॉक्टरांमुळे असे अतिउत्कृष्ठ शिरोमणी डॉक्टर असे प्रमोशन करा, अशीही मागणी युवासेना पिंपरी विधानसभेने केली आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा गुले, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे, शाखाधिकारी ओंकार जगदाळे, राहुल राठोड, रवी नगरकर, सनी कड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.