BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : माउंट कांचनगंगा शिखर सर केलेल्या गिर्यारोहकांचा रविवारी सत्कार कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पुण्यातील गिरीप्रेमी या संस्थेच्या दहा गिर्यारोहकांनी नुकतेच कांचनजुंगा या जगातील तिसर्‍या व भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखरावर यशस्वीपणे चढाई केली. ही मोहीम सर करणाऱ्या सर्व गिर्यारोहकांचा पिंपरी-चिंचवडमधील विविध संघटनांतर्फे जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 23) चिंचवड येथील ऑटॉक्लस्टर सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

या शिखरावर चढाई करणारा हा महाराष्ट्रातील पहिला व एकमेव संघ ठरला आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे व त्या परिसरातील निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी असलेली ही कांचनजुंगा एक्सपेडिशन 2019 ही भारतातील सर्वात पहिली व मोठी नागरी मोहीम होती. 21 एप्रिल रोजी सुरू झालेली ही मोहीम 15 मे रोजी संपली.

  • या मोहिमेमध्ये उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा ढोकले, आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर व जितेंद्र गवारे आदींनी सहभाग घेतला. या मोहिमेत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील देखील गिर्यारोहक सहभागी झाले.

या उपक्रमाची माहिती शहरातील सर्व खेळाडू, गिर्यारोहक, ट्रेकर्स व नागरिकांना मिळावी. तसेच अवघड मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व सहभागी गिर्यारोहकांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग क्लब, वृक्षवल्ली ग्रुप, चला मारू फेरफटका, बजाज ऑटो ट्रेकिंग क्लब, सिंहगड ट्रेकर्स, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, साई एडवेंचर, अंघोळीची गोळी, जलदिंडी, पोलीस मित्र, माउंटन एज एडवेंचर, वाईल्ड ट्रेल, क्रीडा भारती, सह्याद्री प्रतिष्ठान, सह्यकडा एडवेंचर, अविरत श्रमदान, निसर्ग राजा मैत्र जीवांचे, इंडो ऍथलेटिक्स सोसायटी, सायकल मित्र, दुर्गमित्र ट्रेकिंग क्लब, वर्ल्ड फॉर नेचर, भावसार विजन आधी संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमात धनंजय शेवाळे यांनी घेतलेल्या यशस्वी ग्रहकांच्या मुलाखतीतून व लघुपटाच्या माध्यमातून या मोहिमेची माहिती दिली जाणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3