Pimpri: कांस्यपदक विजेत्या प्रणित आढाव, रुजुला देवघरे यांचा पालिकेतर्फे गौरव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धेत सहभाग घेऊन कांस्यपदक पटकाविणा-या प्रणित आढाव व रुजुला देवघरे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. महापौर राहुल जाधव, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना प्रशिक्षित करणा-या प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचा देखील सन्मान करण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे, नगरसदस्य विलास मडीगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर,विकास डोळस, नगरसदस्या करुणा चिंचवडे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.