Pimpri : गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेज नगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रमासाठी प्रा. संतोष ढगे, सचिव रो. गौरव शर्मा, रो. जिग्नेश अगरवाल, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे प्रोजेक्ट डायरेक्टर रवी नामदे, राजू गुणवंत, संतोष शेळके, अर्चना तौंडकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे आदी उपस्थित होते.

  • प्रा. संतोष ढगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरची विविध दालने उघडली जातात. सायन्सला जाऊन केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न न बाळगता आपण ज्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकतो, याचा विचार आपण करायला हवा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मार्गदर्शक होऊ शकता. तसेच विविध भाषा शिकून भाषांतर करण्याच्या अनेक संधी मिळवता येतात. वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करण्याच्या संधी आहेत, असेही प्रा. ढगे म्हणाले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाळेची बॅग भेट म्हणून देण्यात आली. माजी नगरसेवक नारायण बहिरवडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. सारिका रिकामे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.