Pimpri: पोलिसांसमोर भर चौकात मद्यपींची गुंडगिरी

एमपीसी न्यूज – एका कार समोर मद्यपान केलेल्या तरुणाची दुचाकी आली आणि अपघात झाला. ही घटना पिंपरी चौकात मंगळवारी (दि. 10) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर दुचाकीवरील तरुण आणि त्याच्या साथीदारांनी भर चौकात गोंधळ घातला. त्यावेळी चौकात पोलीस हजर होते, मात्र ते गोंधळ घालणाऱ्याला रोखू शकले नाहीत.

 

कारमधून जाणाऱ्या कुटुंबाला मद्यपींनी शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की केली. यावेळी पिंपरी चौकात बंदोबस्तासाठी पाच ते सहा पोलीस हजर होते. वाहतूक पोलिसांनी मद्यपींना रोखून धरले. मात्र दुसरीकडे खाकी वर्दीतील पोलीस हतबल होऊन त्या गुंडांची दादागिरी पाहत होते. त्या तरुणांना अडविण्याचे धाडस खाकी वर्दीतील पोलिसांनाही झाले नाही.

 

 

काही वेळ गोंधळ झाल्यानंतर अखेर नागरिकांच्या मदतीने कारमधील कुटुंबास जाण्यास मदत झाली. ते कुटूंब तक्रार देण्यासाठी संत तुकाराम नगर चौकीत गेले. मात्र तेथे पूर्वीपासून सुरू असलेला नेहरूनगरमधील तरुणांचा गोंधळ पाहून त्यांनी तक्रार न देता चौकीतून काढता पाय घेतला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like