Pimpri : रामदेव बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा – जिजाऊ ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – नुकतेच ठाणे येथील कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा (Pimpri) यांनी महिलांच्या पेहराव, कपडे, सुंदरता या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी स्वीकारले यावेळी जिजाऊ ब्रिगेड पुणे, जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, संघटक हेमा ग्यानी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा स्मिता म्हसकर, रत्नमाला खराडे, रत्नप्रभा सातपुते यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Thergaon : हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव हवी – ॲड. नारायण रसाळ

रामदेव बाबा यांनी जाणून बुजून महिलांविषयी अश्लील, लज्जा उत्पन्न होणारे वक्तव्य (Pimpri) केले आहे. याविषयीची क्लिप प्रसार माध्यम व इतर माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. रामदेव बाबा यांनी केलेले कृत्य हे जाणून बुजून केले आहे. हा विनयभंगाचा गुन्हा आहे. तरी रामदेव बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा तीन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याचा जो काही उद्रेक होईल याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.