Pimpri : अखेर रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी; नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

यासंदर्भातील 8081चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करणेबाबतची परवानगी आज मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांनी महापालिकेला दिली आहे. :Finally the work of the railway flyover at pimpri Dairy Farm was initiated; Success in the pursuit of corporator Sandeep Waghere

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासंदर्भातील 8081चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करणेबाबतची परवानगी आज मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांनी महापालिकेला दिली आहे.

भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी  परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, निवडून आल्यानंतर 19/05/2017 रोजी   पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना पहिले पत्र देऊन  या विषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

त्यानंतर 20/09/201 रोजी पुन्हा दुसरे पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. रेल्वे उड्डानपुलाचे काम तत्काळ मार्गी लागावे यासाठी स्वत: दिल्ली येथे जाऊन तत्कालीन रक्षा मंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयाची पार्श्वभूमी त्यांना सांगण्यात आली होती.

कमांडट, स्टेशन हेद्क्वार्टर, खडकी यांनी दि.  22/10/2013 चे पत्रान्वये महापालिकेस संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या रस्त्यांमधील अ.नं. 15 – पिंपरी डेअरी फार्म रस्ता यासाठी   2,86,87,651 रुपये ( 8081.०० चौ.मी. क्षेत्रासाठी ) इतकी रक्कम संरक्षण विभागाकडे जमा करनेबाबत कळविले होते.

त्यानुसार महापालिकेने  2,86,87,651 रुपये ( 8081.०० चौ.मी. क्षेत्रासाठी ) दि.20/11/2013रोजीच्या पत्रान्वये  संरक्षण विभागाकडे जमा केलेली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेने संरक्षण विभागाचे सूचनेनुसार 11/02/2015 पत्रान्वये ( अ.नं.15 – पिंपरी डेअरी फार्म ) नवीन रस्ता आखणी प्रकरण संरक्षण विभागास सादर केलेले आहे.

सदरच्या नवीन रस्त्याचे आखणी प्रकरणानुसार वाढीव 2717 चौ.मी.क्षेत्रासाठी संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या3550 प्रती चौ.मी.या जमीन दरानुसार वाढीव रक्कम महापालिका संरक्षण विभागास देण्यास तयार असून नवीन रस्ता आखणीनुसार महापालिकेने रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम हाती घेतले असून महापालिकेस संरक्षण विभागास अदा केलेल्या रक्कमेच्या क्षेत्रफळा इतक्या क्षेत्रावर उड्डाणपुलाचे काम सुरू करणेस संरक्षण विभागाने त्वरित मंजूरी द्यावी, अशी आग्रही  मागणी  निर्मला  सीतारामन यांचेकडे करण्यात आली होती.

यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिस पुणे व  मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांचेकडे 1 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून उड्डाणपूलाच्या कामास परवानगी देणेबाबत महापालिकेस परवानगी देण्यात यावी यासाठी विनंती करण्यात आली होती.

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे, असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले.

सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी  परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडीची देखील समस्या सुटणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.