_MPC_DIR_MPU_III

Pimpri : संजोग वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते व पिंपरी विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांच्याकडून राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांना एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

_MPC_DIR_MPU_IV

नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ ,संजय लंके,अमोल भोईटे, बिपिन नाणेकर, विलास भोईर, बंडू खुळे, दीपक जाधव, बापू खेडकर, समीर भंडारकर, मनोज सावंत,संदीप पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आदी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात हजारो लोकांची घरे, जनावरे वाहून गेली. आर्थिक नुकसान झाले. काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा बिकट परिस्थितीस अवघा महाराष्ट्र या पूरबाधितांच्या मदतीसाठी धावला.

_MPC_DIR_MPU_II

या लोकांना सर्वच ठिकाणाहून अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू, शैक्षणिक साहित्य, जनावरांसाठी चार अशा अनेक गोष्टींची मदत पाठविण्यात येत आहे. पुरबाधितांना मदत व्हावी, या सद्हेतूने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुढाकार घेतला असून विविध माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही शेखर ओव्हाळ युवा मंचातर्फे सांगली भागात मोठी मदत पाठविण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरबाधितांसाठी एक लाख रुपयांची मदत करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार युवानेते पार्थ पवार यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश शेखर ओव्हाळ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पार्थ पवार यांनी वाघेरे आणि ओव्हाळ यांच्या या  निर्णयाचे  स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

पूरग्रस्त भागातील नागरिकांचे दुःख काही प्रमाणात कमी करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न असून यापुढेही पूरग्रस्तांसाठी यथाशक्ती मदत करणार असल्याचा मनोदय शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि युवानेते शेखर ओव्हाळ यांनी व्यक्त केला. यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.