Pimpri: राहुल मस्के यांच्या कुटुंबीयांना पन्नास हजारांची मदत, रामदास आठवले यांच्या हस्ते दिला धनादेश

एमपीसी न्यूज – चिंचवड, आनंदनगर येथील आरपीआयचे वार्ड अध्यक्ष राहुल मस्के, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव हाफिज फारूख शेख यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुबीयांची आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. राहुल मस्के यांच्या कुटुंबीयास मंगल राहुल मस्के यांना पक्षाच्या वतीने रुपये पन्नास हजार रुपयांची मदतीचा धनादेश देण्यात आला.

शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, चंद्रकांता सोनकांबळे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष खाजा शेख, बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, युवा नेते कुणाल वाव्हळकर, राकेश वाघमारे, संजय सरोदे, मनोज जगताप, दिनकर मस्के, हरी नायर, यशवंत सूर्यवंशी, विलास कांबळे, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, सुजित गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.