Pimpri : बुलढाण्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मराठवाडा जनविकास संघातर्फे आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था पिंपळे गुरव आणि लेवा भ्रातृ मंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्तपणे मलकापूर (जि. बुलढाणा) येथील जनता कला-वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

  • यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार, लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष क्रुष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.

    शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड हे ज्या शाळा व महाविद्यालयात शिकले, त्या अनुक्रमे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘सैनिकी शिक्षण आणि त्याद्वारे उपलब्ध करिअरच्या संधी’ याबाबत कृष्णाजी खडसे यांनी, तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या संधीबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शहीद संजयसिंह राजपूत यांचे सुपुत्र जय राजपूत यांनी ‘माझ्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी मी देखील सैन्यातच भरती होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.