Pimpri : नराधम बापाकडून मुलावर अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज – बापाने पोटच्या मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच पत्नीवर देखील अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय (पत्नी) महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासू आणि दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आरोपी पतीशी 2010 साली लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी महिलेला संगनमत करून मारहाण व शिवीगाळ करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने फिर्यादी महिलेला अश्लील व्हिडियो दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

तसेच पतीने त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला देखील अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार कला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.