Pimpri : प्लॅस्टिक तपासणी करणाऱ्या ‘आरोग्य’ विभागाच्या कर्मचा-यांना डांबून ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बंदी असलेले प्लॅस्टिक तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना पिता-पुत्राने दुकानात डांबून ठेऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27 दुपारी एकच्या सुमारास वल्लभनगर एसटी स्टॅन्डसमोर घडली.

सुनील हरीश चौहान (वय 54, रा. घोरपडे, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रमेश शिरभाते (वय 46), रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील आरोग्य विभागात कर्मचारी आहेत. आरोपी शिरभाते यांचे वल्लभनगर एसटी स्टॅन्डसमोर हिरामती वाईन्स हे दुकान आहे. बंदी असलेले प्लॅस्टिक तपासण्यासाठी फिर्यादी सुनील त्यांच्या सहका-यांसह आरोपी शिरभाते यांच्या दुकानात गेले. त्यावेळी आरोपींनी सुनील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच त्यांना दुकानात डांबून ठेऊन धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.