Pimpri : एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजल्याप्रकरणी व्यवस्थापक, डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एक वर्षाच्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना एक्सरे मशीन फुटली. या घटनेत चिमुकली भाजली. ही घटना न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक, डॉक्टर आणि टेक्निशियन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवस्थापक गिरीश मोटे, डॉ. सुयोग सोमकुंवर, डॉ. रवींद्र फुलारी, टेक्निशियन अक्षय पाटील, टेक्निशियन अपूर्वा कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शार्वी भूषण देशमुख (वय 1) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. प्रियांका भूषण देशमुख (वय 31, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शार्वीला युरिन इन्फेक्शन झाल्याने तिच्यावर मागील एक महिन्यापासून सांगवी येथील भालेराव चिल्ड्रन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. भालेराव हॉस्पिटलमधून शार्वीच्या पालकांना काही तपासण्या करण्यास सांगितले. हॉस्पिटलकडून पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमधून तपासण्या करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार, शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. गुरुवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास शार्वीला तपासणीसाठी लॅबमध्ये घेतले.

शार्वीच्या आई आणि आजोबांच्या उपस्थितीत ही तपासणी सुरु होती. मशीनमध्ये शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्सरे मशीनचा काही भाग फुटला. फुटलेल्या भागातून रसायन सांडले. हे रसायन शार्वी, तिची आई आणि आजोबांच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. याबाबत अपूर्वा यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.