BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : उसने दिलेल्या पैशासह गाडी लंपास

229
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कामासाठी दिलेले उसने पैसे आणि मोपेड गाडी परत न देता केलेल्या फसवणूकप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • महादेव संतू औटी (वय 51, रा. वल्लभनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार झेवीअर ख्रिस्तोफर अॅथोनी (वय 49, रा. वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेवीअर हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. त्याने फिर्यादीकडून 22 जानेवारी रोजी कामासाठी 40 हजार रुपये आणि मोपेड गाडी घेतली होती. मात्र, महिना उलटून गेला तरी त्याने पैसे आणि गाडी परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.