Pimpri : गणेश विसर्जनासाठी शहरातील 26 घाटांवर अग्निशमन विभाग सज्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश विसर्जन गुरुवारी (दि. 12) होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 26 घाट तयार करण्यात आले आहेत. या सर्व घाटांवर अग्निशमन विभागाचे जवान तैनात झाले आहेत. 8 अग्निशमन अधिकारी, 55 अग्निशमन जवान, 9 जीवरक्षक, 25 प्रशिक्षणार्थी अधिकारी असा फौजफाटा अग्निशमन विभागाकडून सर्व घाटांवर तैनात करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून इंद्रायणी, पवना आणि मुळा या तीन नद्या वाहतात. या तीन नद्यांच्या किनारी 24 घाट तयार करण्यात आले आहेत. तर इतर दोन घाट बनविण्यात आले आहेत. सर्व घाटांवर कृत्रिम घाट देखील बनविण्यात आले आहेत. यामुळे नदी प्रदूषण आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे प्रशासनाचा भर असलेला दिसतो. महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनासोबत अग्निशमन विभाग हा देखील गणेशोत्सवातील प्रमुख घटक आहे. हे तिन्ही घटक गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण अकादमीचे संचालक तथा राज्य अग्निशमन सल्लागार प्रभात रहाणंदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वरिष्ठ प्रशिक्षक किरण हत्याळ यांच्या सहकार्याने 25 प्रशिक्षणार्थी अधिकारी गणेशोत्सव सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला मिळाले आहेत. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक व मदतनीस म्हणून तत्पर सेवा देणार आहेत.

प्रशिक्षणार्थी अधिकारी गणेशोत्सव काळात मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचनालायाशी वेळोवेळी पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्य अग्निशमन अधिकारी प्रशिक्षण वर्ग सुरू झाल्यापासून प्रथमच प्रशिक्षणार्थी अधिकारी देण्यात आले आहेत. सर्व विसर्जन घाटांवर पथके नेमण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाच्या पथकांमध्ये लिडिंग फायरमन, फायरमन यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत लाईफ जॅकेट, लाईफरिंग, दोर, गळ असे अत्यावश्यक साहित्य दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन घाट –

# किवळेगाव महादेव मंदिर – पवना नदी
# रावेत घाट – पवना नदी
# रावेत भोंडवे वस्ती (मळेकर घाट)
# पुनावळे गाव, स्मशानभूमी/राम मंदिर घाट – पवना नदी
# ताथवडे स्मशानभूमी घाट – पवना नदी
# वाल्हेकरवाडी जाधव घाट – पवना नदी
# प्राधिकरण तळे, गणेश तलाव
# थेरगाव पूल घाट – पवना नदी
# मोरया गोसावी घाट – पवना नदी
# केशवनगर, चिंचवड घाट – पावन नदी
# पिंपरी स्मशानभूमी घाट – पवना नदी
# सुभाष नगर घाट, पिंपरी – पवना नदी
# काळेवाडी स्मशान घाट – पवना नदी
# काटे पिंपळे घाट क्रमांक एक – पवना नदी
# पिंपळे गुरव घाट – पवना नदी
# पिंपळे निलख घाट – मुळा नदी
# वाकड गावठाण घाट – मुळा नदी
# कस्पटेवस्ती घाट – मुळा नदी
# सांगवी स्मशान घाट – पवना नदी
# सांगवी दशक्रिया विधी घाट – पवना नदी
# सांगवी वेताळ बाबा मंदिर घाट – पवना
# कासारवाडी स्मशान घाट – पवना नदी
# फुगेवाडी स्मशान घाट – पवना नदी
# बोपखेल घाट – मुळा नदी
# चिखली स्मशान घाट – इंद्रायणी नदी
# मोशी नदी घाट – इंद्रायणी नदी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.