Pimpri Fire News : पिंपळे निलख येथील आगीत दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथे एका इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर आग लागली. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी घडली. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

गोविंद मिलाने (वय 20), रेखा मिलाने (वय 45) अशी जखमींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर, पिंपळे निलख येथे ओपुला सोसायटी ही 18 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी उपकेंद्राचा एक असे तीन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते.

अग्निशमन विभागाचे 27 जवान घटनास्थळी दाखल झाले. सोळाव्या मजल्यावर आशिष मिलानी यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली होती. सोसायटीमधील वॉटर स्प्रिंकलर सिस्टम / स्प्रिंकलर पंप कार्यान्वित नसल्याने आग स्वतःहून नियंत्रणात राहिली नाही. फ्लॅटमध्ये पूर्ण फर्निचर, पीओपी लाइटनिंग केलेले होते. त्यामुळे आगीने रुद्र रूप त्वरित धारण केले.

सोसायटीमध्ये बसविण्यात आलेल्या फायर हायड्रंट सिस्टीमचा वापर करून पाण्याच्या साह्याने मारा करून आग संपूर्णपणे विझवण्यात जवानांना यश आले. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.