Pimpri Fire News : अजमेरामध्ये विद्युत रोहित्राला आग

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी येथे विद्युत रोहित्राच्या स्फोटात दोन महिलांसह एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एका विद्युत रोहित्राला आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 25) दुपारी तीनच्या सुमारास अजमेरा पिंपरी येथे ही घटना घडली.

अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने विद्युत रोहित्राला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली.

लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, वाहन चालक विशाल बाणेकर, फायरमन मयूर कुंभार, ट्रेनी सब ऑफिसर श्री पडळकर, नयन कदम या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आले.

विद्युत रोहित्राच्या बाजूलाच एक रहिवासी सोसायटी आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.