Pimpri Fire News : पिंपरीतील आगीत दहा हजार वृक्ष जळून खाक

एमपीसीन्यूज : पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरामध्ये लागलेल्या आगीत एकूण दहा हजार वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण निमविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून मिलिटरी डेअरी फार्म परिसरामध्ये एकूण ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, आज सायंकाळी या वृक्षांना आग लागली. यामध्ये सुमारे दहा हजार वृक्ष जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आगीचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे यांनी त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केल्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तसेच खासगी टँकर मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.